पुणे

दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

CD

नसरापूर, ता.१६. : सारोळा (ता.भोर) येथील पिण्याचे पाणी दूषित झाले. यामुळे गावात जुलाबाची साथ पसरली आहे. आतापर्यंत सुमारे ३८ जणांवर उपचार केले आहेत. आरोग्य विभागाच्या भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्र व सारोळा उपकेंद्राच्या वतीने कर्मचाऱ्यांची गावामधील सर्व नागरिकांची तपासणी केली आहे. त्रास होणाऱ्यांवर त्वरित उपचार करण्यात येत आहेत.

दूषित पाण्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांची तहसीलदार सचिन पाटील यांनी आज (ता. १६) आरोग्य पर्यवेक्षकांसह भेट घेतली व गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. पाटील यांनी गावच्या पाण्याच्या विहिरी, टाक्या, पाइपलाइन गेलेली जागा आदींची पाहणी केली. तसेच पाण्याची नवीन योजना ट्रान्सफॉर्मर अभावी बंद असल्याची माहिती मिळताच याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली.

आरोग्य विभागाच्या वतीने पिण्याचे पाणी तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये दोष असल्याचे निदर्शनास आल्यावर गावामध्ये तातडीने तपासण्या सुरू करण्यात आल्या. तर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक घरात मेडिक्लोर वाटण्यात येऊन पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून जलशुद्धीकरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या पाण्याच्या दोन्ही टाक्या साफ करण्यात येऊन जलशुद्धीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ सेवा देण्याच्या सूचना केल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी देखील गावास भेट देऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

विहिरीची पाहणी करताना सारोळ्याच्या सरपंच रूपाली साईनाथ धाडवे, सदस्य झुंझार धाडवे, काळुराम महांगरे, ग्रामस्थ मच्छिंद्र धाडवे, साईनाथ धाडवे, वैभव धाडवे, तलाठी सुरेश किरवले, ग्रामसेवक जे. एस. बिराजदार आदी उपस्थित होते.


आरोग्य पथकाने गावात घरोघरी भेट देत रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. ही साथ आटोक्यात असून, आरोग्य पथक गावात थांबून आहे.
- डॉ. योगेश राऊत, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, भोंगवली आरोग्य केंद्र


पाणी दूषित झाल्याचे समजताच दोन्ही टाक्या स्वच्छ करून घेतल्या आहेत. घरोघरी मेडिक्लोर देण्यात येऊन नागरिकांना पाणी उकळून किंवा मेडिक्लोर टाकून पिण्याच्या सूचना दिल्या आहेत
- रूपाली धाडवे, सरपंच

03142

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT