पुणे

नसरापूर आरोग्य केंद्राचा वनवास संपला

CD

नसरापूर, ता.११ : नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी चेलाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारील ४० गुंठे जागा देण्यात आली आहेत. तांत्रिक बाबी पूर्ण होऊन महिनाभरात जागेचा ताबा जिल्हा परिषद आरोग्यविभागाकडे देण्यात येणार आहे. यामुळे नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा जुन्या वाड्यातील जुनाट व कोंदट जागेतील वनवास संपणार आहे. आता नवीन इमारतीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास जागा नसल्याने अद्याप नवीन इमारत होऊ शकली नव्हती. यासाठी गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सुमारे ८४ गुंठे जागेमधील ४० गुंठे जागा आरोग्य केंद्रास उपलब्ध व्हावी यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्यास राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून मान्यता मिळाली. त्यातील चाळीस गुंठे जागा जिल्हाधिकारी यांच्या नावे वर्ग केली आहे यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून ही जागा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाची जागा शासनाच्याच एका विभागाला देण्यासाठी सहायक निबंधकांकडे नोंदणी करण्याची गरज नसते. मात्र त्यासाठीचा मुद्रांक शुल्क शासनाकडे भरावा लागतो यासाठी जिल्हा आरोग्यविभागाने या जागेसाठी लागणारा मुद्रांक शुल्क रुपये चार लाख चार हजार याची तरतूद मार्च २०२३ मध्ये केली होती.
दरम्यान, पाच लाख पन्नास हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून या जागेचा दस्त तहसीलदार भोर यांच्याकडून आरोग्यविभागासाठी गटविकास अधिकारी भोर यांच्याकडे होणार असून तशी सातबारा उताऱ्यावर नोंद होऊन आरोग्यविभागाला या चाळीस गुंठे जमिनीचा ताबा मिळणार आहे.
नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६० हजार नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. या केंद्रांतर्गत वेळू, देगाव,कासुर्डी, कापूरहोळ, हातवे, शिवरे, केळवडे व जांभळी आठ उपकेंद्र असून, देगाव व कासुर्डी गु.मा. सोडता सर्व ठिकाणी उपकेंद्राच्या इमारती आहेत.

जागेच्या हस्तांतरणाबाबत सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून मुद्रांकशुल्काची पूर्ण रक्कम भरल्या नंतर ४० गुंठे जागेचा येत्या एक महिन्यात ताबा मिळणार आहे. त्यावर आरोग्य केंद्राच्या ठरलेल्या नकाशाप्रमाणे इमारत बांधकामाची कार्यवाही सुरु होईल.
- डॉ जयदीपकुमार कापशीकर, वैद्यकीय अधिकारी, नसरापूर


03303

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT