पुणे

कर्ज मंजूरीच्या बहाण्याने अडीच लाखाची फसवणूक

CD

नसरापूर, ता.१८ : व्यवसायासाठी ३६ लाख रुपये कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगून दोन लाख पन्नास हजार रुपये घेऊन एकाने पोबारा केला आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी नीता सतीश आवाळे (वय ४२ रा. सारोळा ता.भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी सारोळा येथे त्यांच्या शेजारी राहणारा अषुतोष चौगुले (मूळ गाव बेळगाव (पूर्ण पत्ता नाही) याने आवाळे यांना त्यांच्या घरगुती व्यवसायासाठी ३६ लाख रुपये कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगितले. त्या कर्ज मंजुरीसाठी पैसे लागतील, असे सांगून जून २०२२ पासून जून २०२३ पर्यंत वेळोवेळी मागून दोन लाख पन्नास हजार रुपये घेतले. यानंतर चौगुले यास कर्ज मंजुरीबाबत वारंवार विचारले असता साहेबांची सही राहिली आहे. ती सही झाली की रक्कम मिळूल, असे त्याने सांगितले. परंतु एप्रिल महिन्यापासून तो बेपत्ता आहे. त्याचा मोबाईलही बंद आहे. त्याचा शोध घेतला असता सापडला आला नाही. म्हणून फिर्यादीने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जून महिन्यात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत किकवी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT