पुणे

विकास कामे करताना नागरिकांची साथ हवी

CD

नसरापूर, ता.२५ : ‘‘लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामे करताना नागरिकांकडून देखील आम्हाला तेवढीच साथ मिळावी, अशी अपेक्षा असते. विकास कामांबाबत आम्ही मोकळ्या मनाने पाभारीवर मूठ सोडली आहे. त्याप्रमाणेच उगवावे अशी आमची अपेक्षा आहे. कुरंगवडी येथील नागरीकांनी आत्तापर्यंत चांगले सहकार्य केले आहे या पुढे देखिल मिळेल’’ असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी कुरंगवडी येथे बोलताना व्यक्त केला.
कुरंगवडी (ता.भोर) येथील मुख्य रस्ता एक कोटी ४२ लाख, जलजीवन नळपाणीपुरवठा योजना एक कोटी ६८ लाख रुपये या कामांचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कार्यालय ते धनगर वस्ती या १ कोटी ६५ लाख रुपयांच्या कामाचे व काटेवस्ती साकव पूल ३५ लाख,घुबडदरी रस्ता सिमेंटकाँक्रिटीकरण पाच लाख रुपये या कामांचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हे तालुकाध्यक्ष नाना राऊत,भोरचे माजी सभापती लहुनाना शेलार,बाळासाहेब थोपटे, दिनकर धरपाळे, राजगडचे संचालक अरविंद सोंडकर, बाजार समितीचे माजी उपसभापती संपतराव आंबवले, कुरंगवडीच्या सरपंच अंजली ननावरे, उपसरपंच सचिन शिळीमकर, सदस्य विश्वनाथ कचरे, नीलम सणस, संगीता घोरे, मंदा खंडाळकर, माजी सरपंच विजयबापू शिळीमकर, उदय शिळीमकर, संदीप शिळीमकर, रमेशदादा शिळीमकर, नरेश शिळीमकर, लालाकाका शिळीमकर, पोपटबापू शिळीमकर, अनिल ननावरे, उमेश शिळीमकर, संभाजी कांटे, रामदास शिळीमकर, शालनमाई शिळीमकर, इंदुमाई शिळीमकर, नवनाथ कचरे, संदीप कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिल ननावरे यांनी प्रास्ताविक केले. उदय शिळीमकर यांनी सूत्रसंचालन तर आभार उपसरपंच सचिन शिळीमकर यांनी मानले.
03956

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT