पुणे

सातारा महामार्गावर मृत्यूचा सापळा दुरवस्था झालेल्या जाहीरात होर्डिंग बनलेत मृत्युचा सापळा

CD

किरण भदे : नसरापूर
नसरापूर, ता.१४ : पुणे-सातारा महामार्गावर दुरवस्था झालेले होर्डिंग वर्षानुवर्षे उभे आहेत. कमकुवत होऊन ते वादळीवामुळे कोसळून सर्वसामान्यांचे बळी जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दुरवस्थेमुळे ते मृत्यूचा सापळेच बनल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्याकडे संबंधीत प्रशासन काणाडोळा करीत आहे. अपघात झाल्यावरच या गंभीर प्रश्‍नाकडे शासन लक्ष‍ देणार का? असा सवाल महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यात शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंत तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरात शेकडो जाहिरात होर्डिंग आहेत. यामधील काही होर्डिंग गेली अनेक वर्षांपासून उभे आहेत. त्याचे लोखंडी अँगल गंजले आहेत. काही होर्डिंगचे पत्रे उडाले आहेत. तर काहींचे वाऱ्यावर फडफडत आहेत. वादळ आल्यावर गंजलेले होर्डिंग अँगलस तुटून तसेच कोसळून मुंबईतील घाटकोपरसारखी घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. होर्डिंगचे निखळलेले पत्रे उडून महामार्गावरील वाहनांवर पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही होर्डिंगचे कापड देखील तटलेले आहे. याकडे जाहिरात व्यावसायिक सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत व मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, भोर तालुक्यातील शिंदेवाडी ते सारोळा या महामार्गावरील सर्व होर्डिंग पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अखत्यारीत येतात. तेथे डिसेंबर २०२३ मध्ये आकाशचिन्ह कारवाई विभाग स्थापन करण्यात आला आहे.

शिंदेवाडी ते शिवापूर......५५ होर्डिंग
शिवापूर ते सारोळा.... १०० होर्डिंग


भाड्याच्या लालसेपोटी होर्डिंगला परवानगी
बहुतेक होर्डिंग्ज जाहिरात संस्थांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसते. फक्त जागा मालकाला वार्षिक भाडे द्यायचे व होर्डिंग लावायचे असे प्रकार सर्वत्र आढळतात जागा मालक भाड्याच्या लालसेपोटी अशी मोठी होर्डिंग उभे करण्यास परवानगी देतात नंतर उभारणारी जाहिरात संस्था याची देखभाल करत नाही याकडे जागामालक देखील लक्ष देत नाहीत.


अशी होर्डिंगबाबत नियमावली
- वाहनचालकांच्या डोळ्यावर तिरीप येईल अशा फलकांना मनाई
- कोणत्याही इमारतीवर जाहिरात फलकाची उंची २० फुटांपेक्षा अधिक नसावी
- स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या दाखल्या शिवाय परवानगी मिळत नाही
- गटविकास अधिकारी यांच्या परवानगी शिवाय उभारणीसाठी आवश्‍यक
- ठराविक कालावधी नंतर होर्डिंगचे स्ट्रक्चरल आँडीट होणे बंधनकारक
-फलकाचा आकार १० बाय २० किंवा २० बाय १० ते ४० बाय ३० असावा
- निआँनचे फलक रात्री दहा नंतर बंद ठेवण्याचे बंधनकारक


प्राधिकरणाच्या कक्षेतील सर्व होर्डिंगचा सर्व्हे झाला असून, साधारण १ हजार ५७ होर्डिंग्ज आहेत. पुणे-सातारा महामार्गावर १११ होर्डिंग अनधिकृत अढळल्यावर त्यांची सुनावणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये काही होर्डिंगधारक उपस्थित होते. त्यांच्याकडून स्ट्रक्चरल आँडीट मागवून हमीपत्र भरून घेतले आहे. जे आले नाहीत त्यांना ५३-१ कलमांतर्गत नोटीस बजावून होर्डिंग काढण्यास सांगण्यात आली आहे. येत्या चार दिवसात टेंडर ओपन करून होर्डिंग नामशेष करण्याची कारवाई करणार आहे.

- सचिन म्हस्के, पीएमआरडीएचे तहसीलदार तथा प्रमुख, आकाशचिन्ह कारवाई विभाग

04184

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT