पुणे

भोर तालुक्यातील डोंगरभागात बिबट्याचा वावर

CD

नसरापूर, ता. ९ : भोर तालुक्यातील कांबरे गिऱ्हेवस्ती येथे काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांना बिबट्या आढळून आल्याची घटना ताजी असतानाच वागजवाडी येथे बिबट्याने श्‍वानावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले असून वनखात्याने या बाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
कांबरे खे. बा. गावच्या डोंगराकडील गिऱ्हे वस्तीवर गराडे खिंडीकडे जाणाऱ्या नवीन डांबरी रस्त्याकडे बुधवारी (ता. ५) रात्रीच्या सुमारास महेश शिंदे कामावरून येत असताना त्यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेला होता. या वेळी त्यांनी बिबट्याचे छायाचित्रण केले आहे. याबाबत वनकर्मचाऱ्यांना माहिती दिल्यावर त्यांनी देखील याबाबत खात्री केली होती.
कांबरेतील घटनेनंतर रविवारी (ता. ९) पहाटेच्या सुमारास वागजवाडी येथील रामदास तुकाराम मोरे या शेतकऱ्याच्या पाळीव श्‍वानावर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केले. श्‍वानाला साखळीने बांधल्याने बिबट्याला त्याला बरोबर घेऊन जाता आले नाही. यावेळी एक बिबट्याची मादी आणि तीन पिल्ले असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेची तयारी! १,४५५ कोटींचे प्रकल्प, वाचा संपूर्ण यादी

Cricketer News: क्रिकेटपटूने दिली सोन्याची चेन... मात्र प्रेयसीने गहाण ठेवली; न्यायालयात पोहोचताच संपूर्ण कहाणी उलटली

खोटं रक्त आणि... असा शूट झाला 'सावळ्याची जणू सावली' मधला अमृताच्या अपघाताचा सीन; पाहा BTS व्हिडीओ

Satara News: साताऱ्यातील ‘कास’वर अवैध उत्खनन; तहसीलदारांची व्यावसायिकाला दंडाची नोटीस

Kolhapur Tourist Death : राधानगरीत Engineering महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा दूधगंगेत बुडून मृत्यू; कांबळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT