पुणे

लाडकी बहिण योजना निवडणुकांसाठी

CD

नसरापूर, ता. ४ : ‘‘महाराष्ट्र शासन लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मदत करत आहे, म्हणजे काही उपकार करत नाही. त्यांच्या खिशातून हे पैसे देत नाही, तर जनतेचेच पैसे जनतेला देत आहे. गेली अडीच वर्षे सरकार आहे, तेव्हा का नाही ही योजना चालु केली? आता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन योजना चालु केली,’’ अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुळे यांच्या विजयानंतर कोंढणपूर (ता. हवेली) येथे सिंहगडच्या निष्ठावंत शिलेदारांचा आभार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार कुमार गोसावी, त्र्यंबक मोकाशी, काका चव्हाण, किशोर धनकवडे, नवनाथ पारगे, पूजा पारगे, अभयसिंह कोंडे, श्रीरंग चव्हाण, नितीन वाघ, अनिता इंगळे, पूनम मते, राजेश्वरी पाटील, सचिन दोडके, बुवा खाटपे, अशोक गोगावले, तानाजी पवळे, सतीश दिघे, सचिन पासलकर, आदित्य बांडे हवालदार, अविनाश बांडे हवालदार, जितेंद्र कोंडे, अनंता कोंडे, नाना धोंडे आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडीतील सिंहगडच्या निष्ठावंतांनी खूप परिश्रम घेतले. त्यामुळे आपण निवडणूक जिंकलो, याचा आनंद आहेच, मात्र जबाबदारीसुद्धा वाढली आहे. आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करूयात. कसल्याही परिस्थितीत विधानसभा जिंकायचीच, हे विसरू नका. खडकवासला विधानसभेत जास्त उमेदवार इच्छुक आहेत, मात्र सर्वांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय मी घेणार नाही.’’

महिलांशी साधला संवाद
कार्यक्रम संपल्यावर सुप्रिया सुळे यांनी महिलांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. गोगलवाडी फाट्यावर उड्डाणपूल झाला नाही तर निदान अंडरपास करून द्यावा, अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली. त्यावर सुळे यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व यावर निश्चित तोडगा काढण्यात येईल, असा शब्द दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT