पुणे

सोनार लुटप्रकरणातील ७ आरोपींवर ‘मोका’

CD

नसरापूर, ता. १० : शिवापूर वाडा (ता. हवेली) येथील सोनाराच्या तोंडावर स्प्रे मारून सोन्याच्या दागिन्यांची पिशवी पळवून नेणाऱ्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई करण्याची परवानगी विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापुर यांनी दिली.
शिवापूर वाडा येथील ज्वेलर्सचे मालक यशवंत राजाराम महामुनी हे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून दुकानातील सोने घेऊन पायी घरी जात असताना दोन दुचाकी वरून आलेल्या आरोपींनी त्यांच्याकडील सुमारे ६ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची लुट केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून साहिल हनिफ पटेल ऊर्फ विराज विजय शिंदे (वय २१, रा. आंबेडकर वसाहत, पुणे), रोहीत ऊर्फ बाबा प्रकाश साठे (वय २५, रा. सहकारनगर, पुणे), निखिल भगवंत कांबळे (वय २८, रा. अप्पर, पुणे), नीलेश दशरथ झांजे (वय २५, रा. वडगाव झांजे, ता. वेल्हे), शफीक मकसूद हावरी (वय १९, रा. इंदिरानगर, पुणे), नीलेश पांडुरंग डिंबळे (वय ३०, रा. कल्याण, ता. हवेली) यांना अटक केली, तर आदित्य ऊर्फ पंछी विनायक डोळस (रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) हा अद्याप फरारी आहे.
या गुन्ह्यातील सातपैकी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर व ॲक्टिवा, पाच मोबाईल जप्त केले आहेत. या आरोपींवर कारवाई करून हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृहात जमा आहेत. त्यांच्या विरोधात पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपी साहिल हनिफ पटेल (वय २१, आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पुणे) याने त्याची वरील आरोपींसह टोळी तयार करून संघटीतपणे टोळीच्या वर्चस्वासाठी अनेक गुन्हे केल्याचे निप्षन्न झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राकडे दिला होता. त्यास पोलिस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली. याबाबत पुढील तपास हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले हे करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT