पुणे

नसरापूर-वेल्हे रस्त्यावर जागोजागी खड्डे

CD

नसरापूर, ता. २३ ः नसरापूर-वेल्हे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्याने वाहनचालकांना कसरत करतच प्रवास करावा लागतो. मात्र, वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. असा आरोप नागरिकांनी केला आहे.

नसरापूर ते वेल्हे या साधारण ३५ किलोमीटरच्या रस्त्यावर दुरुस्तीसाठी कायमच दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणाचे खड्डे पावसाळ्यापूर्वीच दुरुस्त करणे गरजेचे असताना फक्त काही ठिकाणीच दुरुस्त केले. नसरापूर-चेलाडी रस्त्याचे काम होणार म्हणून दुरुस्ती केली गेली नाही. दुरुस्तीसाठी आणलेली खडी रस्त्याच्या कडेला तशीच पडून राहिली. पूर्ण रस्त्याचे काम तर झालेच नाही, किरकोळ दुरुस्ती न झाल्याने छोटे खड्डे पावसाने मोठ्ठे झाले. त्यामध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यामधून प्रवाशांना वाट काढत मार्गक्रमण करावे लागते. या बरोबरच माळेगाव, दिडघर, विरवाडी, कुरंगवडी येथे देखील रस्त्यांवर हीच अवस्था आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

पावसाळी पर्यटनास वेल्हे तालुक्यास पर्यटकांची पसंती असते. मोठ्या संख्येने पर्यटक नसरापूर मार्गे राजगड (वेल्हे) तालुक्यात जातात. मात्र, रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे पर्यटकांना देखील कसरत करतच प्रवास करावा लागतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून रस्त्याची तात्पुरती तरी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व पर्यटक प्रवासी करत आहेत.


सततच्या पावसाने खड्डे वाढले असून येत्या दोन दिवसांत या खड्ड्यांमुळे मुरूम टाकून दुरुस्ती केली जाईल. तसेच नसरापूर येथील मुख्य रस्त्याचे काम देखील सुरु होत आहे.
- पी. जी. गाडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

माळेगाव (ता. भोर) ः नसरापूर-वेल्हा रस्त्यावर पडलेले खड्डे.
04408

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT