पुणे

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

CD

नसरापूर, ता. ११ : पुणे-सातारा महामार्गावर केळवडे (ता. भोर) गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.
शुवंकर मधुसूदन घोष (वय २८, रा. मुळगाव, नौदा माझापाडा राज्य पश्चिम बंगाल, सध्या रा. हॉटेल सम्राट फॅमिली ढाबा, वरवे खुर्द ता. भोर) या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी (ता. ९) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास शुवंकर हा त्याची मोटारसायकल एम.एच. १२ टि डब्लू ०११० वरून कापूरहोळ येथून वरवे येथे येत असताना केळवडे गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावरील राजस्थानी ढाबा जवळ त्याची भरवेगात असलेली दुचाकी घसरली व या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली व त्यात त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताबाबत मृत शुवंकर याचा भाऊ दीपंकर मधुसूदन घोष याने राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत पोलिस हवालदार किरण बरकले पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

Latest Marathi News Live Update : माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात इराणच्या समर्थनार्थ आंदोलन

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT