खेड शिवापूर, ता. १८ : पुणे- सातारा महामार्गावर भरधाव टेम्पोने धडक दिल्याने पायी रस्ता पार करणाऱ्या व्यक्तीचा २ फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. शेषराव नारायण पाटील (वय ५३, रा. संतोषनगर- कात्रज, पुणे) यांचा या अपघातात मृत्यू झाला. याबाबत मंगळवारी (ता. १८) गुन्हा दाखल केला.
याबाबत तानाजी विठ्ठल मोरे (वय ५३, रा. गोगलवाडी) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेषराव पाटील हे २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोगलवाडी फाटा येथून पायी चालत कंपनीकडे जात असताना पुणे- सातारा लेनवर भरधाव येणाऱ्या टेम्पोची (क्र. एम.एच. ११ डी.डी. ५७४७) त्यांना पाठीमागून ठोकर बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पो चालकाला टेम्पोसह पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. टेम्पो चालक तुषार दादासाहेब जाधव (वय ४६, रा. अपसिंगे, ता. जि. सातारा) यास ताब्यात घेतले. त्याच्यावर मंगळवारी (ता. १८) गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार सागर गायकवाड करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.