नसरापूर, ता. ९ : सारोळा (ता. भोर) येथील नीरा नदीपात्रात हातपाय बांधून प्लास्टिक पोत्यात टाकलेला तरुणाचा मृतदेह आढळला आहे. तरुणाचा गळा दाबल्याच्या खुणा असून, राजगड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वी पाण्यात टाकल्याची शक्यता असून, रविवारी (ता. ९) तो फुगून किनाऱ्यावर आला होता.
राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक वृषाली देसाई, हवालदार मयूर निंबाळकर, नाना मदने, अक्षय नलावडे, सागर कोंढाळकर या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटली नसून, साधारण ३० ते ३५ वर्षे वय असलेला मध्यम देहयष्टीचा पुरुष जातीचा मृतदेह आहे. त्याच्या गळ्यावर गळा दाबल्याचे व्रण आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोर येथे पाठवला आहे.
प्रथमदर्शनी हा खून असल्याचे निदर्शनास येत असल्याने राजगड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदार मयूर निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.