पुणे

कापूरहोळ ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांचे राजीनामे

CD

नसरापूर, ता. १५ : कापूरहोळ (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या नऊपैकी पाच सदस्यांनी सरपंच कारभारात विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत राजीनामे दिले.
कापूरहोळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य गुलाब बाळासाहेब गाडे, रोहीत सर्जेराव जगताप, शोभा आनंद गाडे, सविता विवेक गाडे, विनया अनिकेत सपकाळ या पाच सदस्यांनी त्यांचे राजीनामे सरपंच ग्रामपंचायत कापूरहोळ यांच्या नावे पोस्टाने पाठवले आहेत. राजीनामा दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यामध्ये कापूरहोळ ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची नियमित मासिक बैठक होत नाही. सदस्यांना ग्रामपंचायत कारभारात विश्वासात घेतले जात नाही. त्यांचे म्हणणे विचारात घेतले जात नाही, अशी तक्रार केली असून, ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, या कारणासाठी आम्ही आमच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
याबाबत गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे याबाबत निवेदन अद्याप पोचले नाही. सदस्यांच्या राजीनाम्याबाबत ग्रामपंचायत सरपंच निर्णय घेत असतात. निवेदन आल्यावर त्यांच्याकडेच पुढील कार्यवाहीसाठी पाठवले जाईल.
याबाबत कापूरहोळच्या सरंपच मंगल गाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उपसरपंच पंकज गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या कारभारात सर्वांना विश्वासात घेऊनच काम केले जाते. काही सदस्यच मासिक बैठकीला उपस्थित राहत नाहीत. राजीनामा दिलेल्या सदस्यांनी अद्याप प्रत्यक्षात येऊन राजीनामे दिलेले नाहीत. २१ एप्रिल रोजी याबाबत बैठक आयोजित केली आहे. त्यावेळी चर्चा करणार आहोत. त्यांची इच्छा असेल तर राजीनामा मंजूर करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

SCROLL FOR NEXT