खेड शिवापूर, ता. १ : खेड शिवापूर बाग (ता. हवेली) येथे पुणे- सातारा महामार्गावर हॉटेल कैलाससमोर गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे थांबलेल्या तरुणास जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी दगड व लोखंडी रॉडने मारहाण केली.
बाबत साहील राजेंद्र गोगावले (वय १८, रा. गोगलवाडी, ता. हवेली) याने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २६ मे रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर बाग येथे दुचाकीमधील पेट्रोल संपल्यामुळे तो हॉटेल कैलाससमोर दुचाकीसह उभा होता. त्यावेळी तेथे प्रेम बालाजी कसबे व आदित्य गायकवाड (दोघेही रा. शिंदेवाडी, ता. भोर) व दोन अनोळखी तरुण, अशा चौघांनी त्यास जुन्या भांडणाचा राग मनात धरून भांडावयास सुरुवात केली. यावेळी आदित्य गायकवाड याने खाली पडलेला दगड उचलुन साहिल याच्या डोक्यात घातला. यावेळी साहील पळु लागला असता चक्कर येऊन खाली पडला. त्यावेळी प्रेम कसबे याने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत केली, तर इतर अनोळखी दोघांनी लाथाबुक्याने साहील यास मारहाण करत शिवीगाळ दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत प्रेम कसबे, आदित्य गायकवाड व दोन अनोळखी तरुण, अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार प्रमिला निकम करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.