पुणे

बँक ऑफ महाराष्ट्र नसरापूर शाखेचे कामकाज ठप्प

CD

नसरापूर, ता. २४ : येथील बँक आँफ महाराष्ट्र शाखेमधील काही कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे पैसे देणे घेणे व्यवहार होऊ न शकल्याने दिवसभर बँकेचे कामकाज ठप्प झाले होते.
यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या नसरापूर (ता. भोर) शाखेमध्ये गेले अनेक दिवस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत ग्राहकांमध्ये नाराजी आहे. हिंदी भाषिक कर्मचारी जबाबदारी घेऊन काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत त्यामध्येच रविवारी (ता. २३) च्या सुट्टीनंतर सोमवारी (ता. २४) बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी असताना बँकेतील दोन्ही रोखपाल (कॅशिअर) अनुपस्थित होते त्यामुळे पैसे काढणे, ठेवण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मोठी अडचण झाली. फक्त दोन हिंदी भाषिक महिला कर्मचारी यावेळी उपस्थित होत्या, त्यांना रोखपालाचे काम करण्याची ग्राहकांनी विनंती केली असता आम्हाला ते काम येत नसल्याचे सांगून त्यांनी रोकड काउंटर (कॅशिअर काउंटर) चक्क बंद ठेवले. याबाबत बँकेमध्ये माहिती घेतली असता दोन रोखपाल कर्मचाऱ्यांपैकी एका महिलेने रीतसर रजा घेतली होती तर दुसऱ्या कर्मचारी महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने त्या अनुपस्थित राहिल्या. तसेच बँकेचे व्यवस्थापक देखील रजेवर होते त्यामुळे बँकेत फक्त दोनच कर्मचारी राहिल्या व त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. याबाबत नसरापूर ग्रामपंचायतीने देखिल दखल घेत बँकेच्या व्यवस्थापकासह वरिष्ठांकडे पत्र पाठवून बँकेच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत कामकाजामध्ये सुधारणा करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

6007

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT