पुणे

नसरापुरात प्रगतशील शेतकरी निगडे यांचा सन्मान

CD

नसरापूर, ता.२७ : नसरापूर (ता.भोर) येथे माळेगाव येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रेय निगडे यांचा नागरी सन्मान करण्यात आला. नैसर्गिक कीटकनाशके, शेतीची औषधे बनवून सेंद्रिय शेती करणाऱ्या निगडे यांना पुणे येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नुकतेच गौरविले होते. यानिमित्त नसरापूर ग्रामस्थ, पंचक्रोशीतील शेतकरी, सामाजिक बांधिलकी ग्रुप व व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने निगडे यांचा नागरी सत्कार नसरापूर येथे करण्यात आला.


शेतकरी दत्तात्रेय निगडे यांनी त्यांच्या अडीच एकर जमिनीत विषमुक्त शेती, नैसर्गिक औषधांचे विविध यशस्वी प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत तालुका कृषी विभागाने घेतली व त्यांचे नाव राज्यपालांच्या हस्ते सन्मानासाठी सूचित केले होते. त्यानुसार पुणे येथील कृषी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात निगडे यांना उत्कृष्ट नैसर्गिक प्रयोगशील शेती केल्याबद्दल देवव्रत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सन्मान सोहळ्याप्रसंगी तालुका कृषितंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहाय्यक लक्ष्मण पटवारी, निवृत्त कृषी सहाय्यक सुनील राशीनकर, भोर महसूल मंडलाधिकारी समीर मुलाणी, नसरापूरचे माजी उपसरपंच गणेश दळवी, ज्ञानेश्वर झोरे, अजिंक्य हाडके, दत्तात्रेय वाल्हेकर, दीपक सोंडकर, गणेश चाळेकर, महेश वनारसे, धनंजय जंगम, सुनील हजारे, विजय जंगम, संतोष हाडके, लक्ष्मण पटवारी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी गणेश दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. गणेश चाळेकर यांनी प्रास्ताविक तर दीपक सोंडकर यांनी सूत्रसंचालन केले.

06011

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Earthquake : इराणवर आता नैसर्गिक संकट ! अमेरिका अन् इस्त्रायलचे बॉम्बहल्ले सुरु असतानाच भूकंपाने देश हादरला

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT