पुणे

गुंजवणेमधून नारायणपूरला पालखी सोहळा

CD

नसरापूर, ता. १ : नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भोर आणि राजगड तालुक्यातील दत्तसेवेकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या पायी दिंडी पालखी आणि ज्योत सोहळ्याचा प्रारंभ सोमवारी (ता. १) राजगड किल्ला पायथा गुंजवणे येथून करण्यात आला.
बुधवारी (ता. ३) नारायणपूर येथे होणाऱ्या दत्तजयंती सोहळ्यास भोर राजगड परिसरातील दत्तभक्त दत्तसेवेकरी पायी दिंडी पालखी आणि ज्योत सोहळ्याचे प्रस्थान किल्ले राजगड येथील पद्मावती मंदिर, शिवमंदिरात अभिषेक करत ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला. पायथा गुंजवणे येथे राजगडचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ व वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते आदी मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजा आणि आरती करून नारायणपुरकडे प्रस्थान करण्यात आले. यावेळी दिनकर सरपाले, अमोल नलावडे, बाळासाहेब रसाळ, शिवाजी जाधव, रामनाना सरपाले यांच्यासह अनेक दत्तसेवेकरी उपस्थित होते.
करंजावणे येथून मंगळवारी (ता. २) पालखी सकाळी मार्गस्थ होऊन कोळवडी, कुरंगवडी फाटा येथे चांगदेव मसुरकर यांच्या वतीने चहा अल्पोपाहार होऊन दुपारी माळेगाव (ता. भोर) येथे लहू शेलार, संतोष सोंडकर यांच्या वतीने दत्त सेवेकऱ्यांना दुपारचे जेवण देण्यात येणार आहे. दुपारी विश्रांती नंतर या पायीवारीचा मुक्काम कापुरव्होळ येथील अमृता गार्डन येथे होणार आहे. बुधवार (ता. ३) सकाळी कापुरव्होळ येथून प्रस्थान होऊन दुपारी चिव्हेवाडी (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थांच्या वतीने भोजन दिले जाणार आहे. दुपारी एक वाजता पालखी नारायणपूर येथे दिंडीचे स्वागत होऊन तेथे सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या दत्तजन्म सोहळ्यात सर्व पायी दत्तसेवेकरी सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT