पुणे

खोपी येथे तृतीयपंथियास लुटले

CD

नसरापूर, ता. ५ : पुणे-सातारा महामार्गावर खोपी (ता. भोर) उड्डाणपुला जवळ थांबलेल्या तृतीयपंथियास तुमचा नृत्याचा कार्यक्रम ठरवायचा आहे म्हणून चर्चा करण्यासाठी महामार्गाच्या बाजूला नेऊन तिघा जणांनी मारहाण करून त्याच्याकडील फोन व रोख रक्कम मिळून ८४ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश ऊर्फ आरुशी श्रीराम जाधव (वय २७ रा. भिलारवाडी, कात्रज, पुणे, मूळ रा. बाळापूर जि. अकोला) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, ता. २८ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जाधव हे टोलनाक्या जवळील खोपी उड्डाणपुलाजवळ उभे असताना तीन अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी सांगितले की, तुमच्या नृत्याचा कार्यक्रम ठरवायचा आहे असे म्हणून त्यांच्या दुचाकी (नंबर माहीत नाही) बसवून त्यांना एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कंपनीजवळ घेऊन गेले व त्या तिघांनी थेट मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवत जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच मोबाइल व पर्स हिसकावून घेत, कोयत्याचा धाक दाखवत खात्यावरील ५९ हजार रुपये फोन पे वरून ट्रान्सफर करण्यास भाग पाडले व जवळील पर्समधील रोख पाच हजार रुपये असा एकूण ८४ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत गुरुवारी (ता. ४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT