पुणे

किकवी येथे लहान मुलावर ब्लेडने वार

CD

नसरापुर, ता. ५ ः खेळण्यासाठी चाललेल्या लहान मुलास अडवून ‘‘तुझे तोंड बंद ठेव नाहीतर तुला मारून टाकीन’’ अशी धमकी देऊन त्याच्यावर ब्लेडने वार करण्यात आले. या प्रकरणी मुलाचे वडील अमृत हरिश्चंद्र अहिरे (वय ३६ रा. किकवी) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ३) दुपारी अडीचच्या सुमारास किकवी येथे पंचशिलनगरकडे जाणाऱ्या पुलावर अमृत यांचा मुलगा चैतन्य हा खेळण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालयाकडे जात होता. यावेळी साहिल क्षीरसागर (पुर्ण नाव माहीत नाही) (रा. किकवी) व त्याचा साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) यांनी काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर येऊन चैतन्य यास धमकी दिली. त्याला मारहाण करून त्याच्यावर ब्लेडने वार केले आणि शिवीगाळ, दमदाटी करून मोटारसायकलवर निघुन गेले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून राजगड पोलिस ठाण्यातील हवालदार राहुल कोल्हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Nashik News : नाशिकवर पाणीसंकट? धरणांमध्ये ६७ टक्के साठा शिल्लक; वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढले

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT