पुणे

जुन्या भांडणातून तिघांना मारहाण

CD

नसरापूर, ता. १३ ः पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरुन देगाव (ता. भोर) गावच्या फाट्यावर गाडी अडवी लावून थांबवून एकास मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोघांना देखिल मारहाण केल्याची तक्रार राजगड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
ओमकार चेतन रजपूत (वय १७ रा. कापूरहोळ ता. भोर) याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार (ता. ११) रोजी दुपारी बाराच्या सुमारास ओमकार हा भाऊ व दोन मित्रांसह कारने पुण्याला जात असताना देगाव फाटा येथे राहणारे बापू वाल्हेकर यांनी त्यांची बुलेट गाडी ओमकारच्या कारला अडवी लावून पेट्रोल पंपावर झालेल्या वादाबाबत जाब विचारून त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या झालेल्या भांडणावरून ओमकार याचे वडील चेतन रजपूत व त्याचा मावसभाऊ असे दोघे मिटवण्यासाठी आले असताना त्यांना देखिल बापू वाल्हेकर त्यांचे दोन पुतणे व एक अनोळखी व्यक्ती अशा चार जणांनी मारहाण केली. यावेळी वाल्हेकर यांनी सिमेंटची विट ओमकारला मारुन जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे
याबाबत बापू वाल्हेकर यांच्यासह त्यांचे दोन पुतणे, एक अनोळखी व्यक्ती असे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार औदुंबर अडवाल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT