पुणे

नसरापुरात भाविकांसाठी ताक, पाण्याचे वाटप

CD

नसरापूर, ता. १५ : महाशिवरात्रीनिमित्त बनेश्वर मंदिरात सुमारे लाखभर भाविकांनी दर्शन घेतले. या भाविकांना नसरापूर ग्रामस्थांनी मोफत ताक, शुध्द पिण्याचे पाणी तसेच प्रसादाचे वाटप केले.
उन्हाच्या झळा सुसह्य होण्यासाठी नसरापूर ते चेलाडी रस्त्यावर सोपानकाका बँकेच्यासमोर ग्रामस्थ अनिल कोंडे, निवृत्त सैनिक साधुराम जगताप, नारायण बोरगे, प्रभाकर गायकवाड, सागर झांजे, तानाजी फडतरे, संभाजी फडतरे, मीरा शेलार, राधा कोंडे, अंकिता गायकवाड व हर्षल जगताप यांनी दिवसभर हजारो भाविकांना मोफत ताकाचे वाटप केले.
नसरापूर एसटी बसथांब्याजवळ डॉ. श्याम दलाल त्यांचे चिरंजीव डॉ. पुष्कर दलाल यांनी देखील सर्व भाविकांसाठी ताकाचे वाटप केले. यावेळी राजतोरण प्रतिष्ठानचे राहुल देशपांडे, सेवक अमोल जगताप उपस्थित होते. मंदिर परिसरातील रस्त्यावर अग्निहोत्र सेवा मंडळाच्या वतीने देखील मोफत ताक व पाण्याचे वाटप केले. अग्निहोत्र सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रेय वाल्हेकर व त्यांचे सहकारी दरवर्षी हा उपक्रम राबवतात.
मंदिरात देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी नागरिकांना खजूर व खिचडीचे वाटप केले. या आदरातिथ्याबद्दल अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले.

06189

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Corridor Project: पंढरपूर कॉरिडॉरची अर्थसंकल्पात घोषणा शक्य; पूर्वतयारी पूर्ण, ४ हजार कोटींच्या प्रकल्पाने बदलणार पंढरपूरचे रूप!

Latest Marathi News Live Update : नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Nafisa Begum Sattar Passes Away : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन; आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Solapur Accident: साेलापुरात टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील तिघे जागीच ठार; दुचाकी सुस्थितीत अन्‌ मृतदेह एकाच ठिकाणी, घातपाताची शंका!

'कोहरा 2'मध्ये प्रीत बाजवा कथा ठरतेय चर्चेचा विषय, पूजा भमराहने साकारलं दमदार महिलेच पात्र

SCROLL FOR NEXT