पुणे

गुंजवणीचा वाघ प्रतिष्ठानकडून मोफत भोजन, अल्पोपाहार

CD

नसरापूर, ता. १९ ः राजगड तालुक्यातील राजगड व तोरणा किल्ल्यावरून शिवजयंतीसाठी शिवज्योत प्रज्वलित करून धावत आपल्या गावाकडे निघालेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिवभक्तांना रात्रीच्यावेळी चहा, अल्पोपाहार व मोफत जेवण उपलब्ध करण्याचे काम जांभळी (ता. भोर) येथील गुंजवणीचा वाघ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
दरवर्षी शिवजयंतीच्या एक दिवस अगोदर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून हजारो युवक- युवती राजगड व तोरणा किल्ल्यावर शिवज्योत प्रज्वलित करून धावत आपआपल्या गावाकडे जात असतात. यादरम्यान, उन्हामुळे रात्री प्रवास करणाऱ्या शिवभक्तांना रात्रीच्यावेळी कुठेही चहा, अल्पोपाहार व जेवण मिळत नाही. ही गैरसोय लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने जांभळी येथे नसरापूर- वेल्हे मार्गावर गेल्या तीन वर्षांपासून शिवजयंतीच्या आदल्या दिवासापासून शिवभक्तांसाठी मोफत चहा, अल्पोपाहार व जेवणाची सुविधा देण्यात येत आहे.
यावर्षी येथील हॉटेल जगदंब येथे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून शिवभक्तांचे स्वागत करत त्यांना रात्रीच्यावेळी भोजनाची व्यवस्था केली. त्यासाठी रात्रभर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून हॉटेलच्या प्रांगणात स्वयंपाकासाठी भट्टी लावून उपस्थित असतात. शिवभक्तांची सेवा हिच आमची शिवजयंती, असे म्हणत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रात्रभर जागून सेवा देत असतात. ही मदत फार महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया छावा ग्रुप सातकी आंधळी (ता, मान, जि. सातारा) यांनी व्यक्त केली. हा उपक्रम तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला म्हणजे ५ व ६ मार्च रोजी देखील राबवण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन

Mumbai Viral Video: मुंबईत 2BHK फ्लॅटचं भाडं किती, इन्फ्लुएंसर तरुणीने सांगितला थक्क करणारा आकडा

Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

खरे मूर्ख तर आम्ही... अंकिता वालावलकरने सांगितली सुरजची स्ट्रॅटेजी; त्याने स्वतःला मुद्दाम गरीब दाखवलं...

Maharashtra SSC Exam 2026: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांनो, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

SCROLL FOR NEXT