पुणे

दुभाजक ओलांडून टेम्पोची ट्रकला धडक

CD

नसरापूर, ता. २० : पुणे- सातारा महामार्गावर हरिश्चंद्री (ता. भोर) येथे शुक्रवारी (ता. २०) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास भरधाव टेम्पो रस्तादुभाजक ओलांडून समोरील लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडकला. या अपघातामध्ये टेम्पोमधील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.
श्रेयस बाळू साळवे (वय १९, रा. धावडवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला, तर टेम्पो चालक अक्षय बापू सकटे (वय २९, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) ट्रक चालक फरीद महंमद, ट्रक क्लीनर इकरार रमजान महंमद (दोघेही रा. आलापूर, उत्तर प्रदेश) हे तिघे जखमी झाले आहेत.
याबाबत ट्रक क्लीनर इकरार महंमद याने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावर हरिश्चंद्री येथे सातारा बाजूकडे जाणाऱ्या टेम्पोवरील (क्र. एम,एच. १२ जे.एफ. ५३६४) चालक अक्षय सकटे याने टेम्पो भरधाव निष्काळजीपणाने चालवून रस्ता दुभाजक ओलांडून सातारा- पुणे जाणाऱ्या लेनवर येऊन समोरून येणाऱ्या ट्रकला (क्र. एम.पी. ०९ ए.एल. ९३०८) जोरदार धडकला. या अपघातामध्ये टेम्पोत बसलेला श्रेयस साळवे हा गंभीर जखमी होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी टेम्पो चालक अक्षय बापू सकटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार नाना मदने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT