पुणे

वन वणवा व्यवस्थापनासाठी नायगाव कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

CD

नसरापूर, ता. ९ : नायगाव (ता. भोर) येथील नवसह्याद्री कॉलेजमध्ये भोर वनविभागामार्फत वन वणवा व्यवस्थापन तसेच नियंत्रणासाठी वन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भोर, नसरापूर व राजगड तालुक्यातील वनक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनसेवक यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेत सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांनी भोर वनविभागात मागील तीन वर्षांत घडलेल्या वन वणव्यांचा सविस्तर लेखाजोखा सादर केला. तसेच भविष्यात वणवा लागू नये तसेच वणवा लागल्यास तो प्रभावीपणे आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
वणवा नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फायर अलर्ट सिस्टीमद्वारे जलद प्रतिसाद देणे, वनकर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समिती सदस्य व स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून वणवा नियंत्रणात आणणे, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
पुणे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नसरापूर वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी भोर शिवाजी राऊत व वन परिक्षेत्र अधिकारी वेल्हा अनिल लांडगे यांच्यासह भोर, नसरापूर व राजगड, वनक्षेत्रातील मोठ्या संख्येने वनपाल व वनरक्षक, वनसेवक उपस्थित होते.

06249

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Philippines earthquake: फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! ३२ जणांचा मृत्यू, दोनशेंपेक्षा अधिक जखमी

Kalyan: कल्याणमध्ये मोठा राडा! टोळक्याकडून रिक्षाचालकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

IND vs AFG: भारताविरुद्ध आऊट नसतानाही अफगाणिस्तानचा खेळाडूनं सोडलं मैदान अन् मग संघसहकाऱ्यांशीस झाला वाद; नेमकं प्रकरण काय?

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ जहाजावर भीषण हल्ला! २४ भारतीय नाविक संकटात; बचावासाठी टाहो

SCROLL FOR NEXT