पुणे

तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये नसरापूर क्लबचे वर्चस्व

CD

नसरापूर, ता. २४ : नसरापूर (ता. भोर) येथील विघ्नहर्ता सेवा प्रतिष्ठान व अखिल ग्रामस्थ महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘युनिक तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६’मध्ये नसरापूर क्लबने सर्वोत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांकाचे ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले.
महिला दिनानिमित्त कुंभारकर लॉन्स येथे रविवारी (ता. २२) या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्‍घाटन पुनम मांगले, विद्या गेंगजे, प्रिया वायदंडे, मनीषा चौधरी, वैष्णवी ढाळे, अनुराधा कदम, अक्षदा तिखाळे, स्मिता विभुते, मधुरा शेटे, अनिता गोळे अशा अनेक महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
युनिक तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये दिवळे क्लबने द्वितीय सात हजार ७७७ रुपये, शिवापूर क्लबने तृतीय चार हजार ४४४ रुपये, तर कापूरहोळ क्लबने चतुर्थ तीन हजार ३३३ रुपये क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेमध्ये बेस्ट फायटर अवॉर्ड काव्या चव्हाण, तन्वी पांगारे, रेणू यादव, अर्णव भगत, वेदांत पिसाळ, आरोही कानडे यांना प्रत्येकी एक हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर परिणीता डिंबळे, कृष्णा शेटे, पूर्वा मेमाने, मनस्वी गिऱ्हे, आदित्य खाटपे या विद्यार्थ्यांनी बेस्ट फायटर ट्रॉफी मिळवली. माजी सभापती सुनीता बाठे यांनी स्पर्धेसाठी मॅट उपलब्ध करून दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, सरपंच उषा कदम, उद्योजक लखन दळवी, जितेंद्र भगत, विशाल शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर विशाल शिंदे यांनी आभार मानले.

06291

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ; 12 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

हार्दिक पांड्या SRH कडून खेळणार? इंस्टा स्टोरी अन् चर्चेला उधाण; Mumbai Indians देखील फिटनेसबाबत काहीच सांगेना

Viral IPL Broadcast Trend: Gemini AI चा भन्नाट ट्रेंड! स्वतःचा फोटो अपलोड करा आणि काही सेकंदांत बना IPL Broadcast मधला Fan

एडिटरच्या बायकोला ३ डझन बांगड्या! संजू राठोडच्या 'लाल कलरची बांगडी'वर अशोक सराफ यांचा डान्स, व्हिडिओ वायरल

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात जोरदार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT