

Hardik Pandya | Mumbai Indians | IPL 2026
Sakal
Mumbai Indians Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) सध्या प्लेऑफसाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहेत. साखळी फेरीतील आता शेवटचे १४ सामनेच बाकी असूनही अजूनही ८ संघांमध्ये प्लेऑफची शर्यत आहे. मात्र यंदा सर्वाधिक निराशा केलेले दोन संघ म्हणजे लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). या दोन्ही संघांचे आव्हान संपले आहे.
पाचवेळच्या मुंबई इंडियन्सला हंगामाच्या सुरुवातीला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदारही समजले जात होते. मात्र हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळणाऱ्या संघाला ११ सामन्यांत आत्तापर्यंत ३ सामनेच जिंकता आले आहेत. अशातच गेल्या दोन सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या खेळलेला नाही, त्यामुळे त्याबाबत बरीच चर्चा होत आहे.