पुणे

शेतमालाला उत्पादन खर्चाप्रमाणे भाव द्या

CD

नसरापूर, ता. ११ : युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही शेतमालाचे बाजारभाव जैसेथेच आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चाप्रमाणे शेतमालास बाजारभाव देण्याची मागणी भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचे (शरद जोशी) पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेतमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली आहे. खतांच्या किमती १३० वरून ३०० रुपयांपर्यंत गेल्या आहेत. शेतीसाठी लागणारे सिंचनाचे पाइप, अवजारे यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. डिझेल, पेट्रोल मिळण्यातील अनिश्चिततेमुळे वाहनचालक देखील चढ्या भावाने भाडे आकारत आहेत. यातच पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याला फक्त ८ ते १० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात कांदा उत्पादनासाठी किलोला १४ ते १५ रुपये खर्च येतो. प्रतिकिलोला ५ ते ७ रुपये तोटा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शेतमालाच्या किमतीत वाढ होणे गरजेचे आहे. शासनाने तातडीने शेतमालाच्या किमती वाढवाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे लक्ष्मण रांजणे व भोर तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष दिलीप भोरडे यांनी केली आहे.
दरम्यान, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बी-बियाणे व खतांची जुळवाजुळव करत असताना या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्च एकरी हजार ते १५०० रुपयांनी वाढणार आहे आधीच शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना या वाढत्या खर्चाने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

एक एप्रिलपासून खताच्या दरात झालेली दरवाढ (रुपयांत)
खताचे नाव.............जुना दर.............नवीन दर.............एकूण वाढ
२०:२०:०:१३.............१५००.............१८००.............३००
१०:२६:२६.............२०२५.............२२५०.............२२५
१२:३२:१६.............२०२५.............२२५०.............२२५
१४:३५:१४.............२१७५.............२२४०.............२२५
१९:१९:१९.............२०७५.............२३००.............२२५
एमओपी.............१८५०.............१९७५.............१२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

Latest Marathi News Live Update : चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक आक्रमक

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात सर्वाधिक विरोध आजरा तालुक्यातून, शेतकऱ्यांनी एकत्र येत हरकती नोंदवल्या

'मिलिंद आणि माझ्यात 21 वर्षांचं अंतर होतं...' मिलिंद सोमणसोबतच्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री म्हणाली, 'आमचं ओपन रिलेशन...'

SCROLL FOR NEXT