पुणे

शिरसगाव काटा येथे पावसासाठी ग्रामदेवतेला साकडे

CD

न्हावरे, ता.१८: जून महिना संपला, जुलै महिना अर्धा संपत आलेला असून, पाऊस काय पडायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पावसाअभावी अद्याप पेरण्या रखडलेल्या आहेत. यामुळे परिसरात भीषण पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी शिरसगाव काटा (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी पावसासाठी ग्रामदैवताला साकडे घातले आहे.
शिरसगाव काटा येथील ग्रामदैवत श्री कोल्हाटी बुवा महाराज मंदिर असून देवाचे वाहन गाढव आहे. ज्या वेळी पाऊस पडत नाही त्यावेळी गाढवाची सवाद्य मिरवणूक काढत गाढवाची पूजा करून त्याला देवाच्या नावाने सोडून दिले जाते व नंतर पाऊस पडतो, अशी गावातील लोकांची श्रद्धा आहे. या वर्षी गेल्या काही दिवसांपासून पाऊस लांबल्याने ग्रामस्थांनी एकत्र देवाचे वाहन असलेल्या गाढव या प्राण्याची पूजा करत वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली. त्यानंतर ग्रामदैवत श्री कोल्हाटीबुवा महाराज यांची पूजा करत देवाला खूप पाऊस पडू दे, असे साकडे घातले.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, माजी सरपंच रामचंद्र केदारी, सारंग जाधव, संजय शिंदे, राजेंद्र लोंढे, सोसायटीचे अध्यक्ष स्वप्नील काटे, मच्छिंद्र इंगळे, माजी संचालक सुभाष गद्रे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाऊस लांबल्याने या भागातील पेरण्या रखडलेले असून, गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खूप पाऊस व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामदैवताची पूजा करत साकडे घातले.

01713

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT