पुणे

''घोडगंगा''चे कामगार आंदोलनावर ठाम

CD

न्हावरे, ता.३१ : न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे काम बंद आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. यामुळे सोमवारी (ता.३१) ३१व्या दिवशीही कामगार त्यांच्या मागण्यांवर ठाम होते.
घोडगंगा कारखान्याकडून कामगारांना दहा महिन्यांचा पगार व इतर देणी मिळून कारखान्याकडे २५ कोटी रुपयांचे येणे बाकी प्रलंबित आहे. संबंधित मागण्यांसाठी कामगारांनी एक जुलैपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, कामगारांची लवकरच देणी देण्यात येतील. कामगारांनी आंदोलन मागे घेऊन कामाला सुरुवात करावी, यासाठी आमदार ॲड. अशोक पवार व संचालक मंडळाने आजपर्यंत तीन वेळा विनंती केली. मात्र, प्रथम पन्नास टक्के प्रलंबित रक्कम खात्यावर जमा करा, तरच आम्ही कामाला सुरुवात करू या मागण्यांवर कामगार ठाम आहेत. यामुळे अद्यापही काम बंद आंदोलन सुरूच आहे.
दरम्यान, आज कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी चौथ्यांदा आंदोलस्थळी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, कामगारांनी अधिकच्या (जास्त) पगारवाढीसाठी काम बंद केले असते तर ते आंदोलन ठरेल पण तुम्ही तुमच्या मागणीसाठी जर काम बंद केले असेल तर याला आंदोलन म्हणता येणार नाही. मी आज संचालक मंडळात एकमेव विरोधी संचालक आहे. मात्र, मी कारखाना व कामगारांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांशी चर्चा करून कामगारांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी विनंती मी संचालक मंडळाला केली आहे, असे त्यांनी कामगारांसमोर बोलताना फराटे यांनी सांगितले.
यावेळेस कामगार नेते महादेव मचाले, कामगार पतसंस्था संचालक तात्यासाहेब शेलार, नानासाहेब मासाळ, दत्तात्रेय महाराज लोंडे, मुकुंद परदेशी, अप्पासाहेब नारनोर, अनिल फलके, संतोष तांबे, संतोष कोळपे, महेंद्र काशीद व सर्व कामगार उपस्थितीत होते.

01728

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT