पुणे

चासकमानच्या कालव्यात आंबळे येथे मोटार उलटली

CD

न्हावरे, ता.२५ : शिरूर चौफुला राज्य मार्गावर आंबळे (ता.शिरूर) येथील चासकमान धरणाच्या कालव्यात मोटार उलटली. अचानक समोरून आलेल्या भरधाव ट्रॅक्टर ट्रालीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये मोटारीतील महिला जखमी झाली तर बाकीचे पाच जण वाचले आहे.
शिरूर पोलिस ठाण्यात अपघाताबाबत मोटारचालक विनोद पारगे (वय ४१) (रा.रीस, ता खालापूर, जि.रायगड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, फिर्यादी पारगे हे नातेवाइकांसह अष्टविनायक यात्रा करत असताना, बुधवारी (ता. २४) सकाळी दहाच्या दरम्यान रांजणगावहून सिद्धटेककडे आंबळे मार्गाने जात होते. त्यावेळी आंबळे शिवार दरम्यान रस्त्यावर अचानक आलेल्या ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात ब्रेक दाबल्याने मोटार थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कालव्यात जाऊन उलटली. दरम्यान, अपघातग्रस्तांना आंबळे येथील ग्रामस्थ राजवर्धन बेंद्रे व अभिजित बेंद्रे यांनी छावा मित्र मंडळ संचालित रुग्णवाहिकेतून करडे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.

02447

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT