पुणे

आंबळयाच्या आखाड्यात २०० मल्लांचा सहभाग

CD

न्हावरे, ता. ४ ः आंबळे (ता. शिरूर) येथील कुलदैवत भैरवनाथ व हनुमान जयंतीनिमित्त भरविण्यात आलेल्या आखाड्यात २०० मल्लांनी सहभाग नोंदवला. ग्रामस्थांना नेत्रदीपक व निकाली कुस्ती पहावयास मिळाल्या. शेवटची कुस्ती प्रतीक बेंद्रे व अथर्व चव्हाण यांच्यामध्ये ५१ हजार रुपयांवर लावण्यात आली होती. कुस्ती बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही मल्लांना समान बक्षिस वाटप करण्यात आले.
गुरूवारी (ता. २) यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे हनुमान जन्मोत्सवानिमित्त संगीत भजन झाले. त्यानंतर छकड्यांची शर्यत झाली. दुपारी भैरवनाथाला दंडवत घालण्याचा कार्यक्रम झाला. रात्री देवाचा छबिना काढण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा “जिवाचं पाखरू” ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.
शुक्रवारी (ता. ३) वस्ताद मच्छिंद्र गायकवाड यांच्या स्मरणार्थ अडीच लाख रुपये खर्च करून श्रीकांत गायकवाड व प्रमोद गायकवाड यांनी आखाडा बांधून दिला. त्यामध्ये प्रथमच कुस्त्या पार पडल्या. ठरलेल्या इनामांपैकी चितपट कुस्ती करणाऱ्या मल्लांना ७५ टक्के बक्षिस रक्कम तर हरलेल्या मल्लाला २५ टक्के देण्यात येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Marathi News: तिसऱ्यांदा चुकला तरी श्रेयस अय्यरवर होणार नाही बंदीची कारवाई, पण...; आयपीएलचा नवा नियम घ्या जाणून

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Fake Caste Certificate: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण! २० वर्षांनी गुन्हा दाखल, पण वेळ निघून गेली

'या' मराठी अभिनेत्रीने 19 व्या वर्षी केलेलं लग्न; परपुरुषासोबत परदेशात गेली पळून पण रस्त्यावर राहण्याची आली वेळ

Latest Marathi News Live Update : सोनाराला फसवून 30 ग्रॅम सोनं चोरलं

SCROLL FOR NEXT