पुणे

पाणवठे कोरडे ठणठणीत

CD

निरगुडसर, ता.३ : रांजणी (ता.आंबेगाव) येथील वनविभाग अंतर्गत असलेल्या जंगलामध्ये वन्य प्राण्यांसाठी पिण्यासाठी बनवलेले पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहे. तरी वन विभागाने तातडीने वन्य प्राण्यांना पिण्यासाठी कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात पाणी सोडण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.
रांजणी वनविभाग अंतर्गत असलेल्या परिक्षेत्रात वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी दोन पाणवठे तयार करण्यात आले आहेत. परंतु मार्च उजाडला तरी अद्याप त्यामध्ये पाणी न सोडल्यामुळे पाणवठे कोरडे पडले आहेत. यामुळे वन्य प्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. या परिसरात मोर, लांडगे, कोल्हे, ससे, बिबटे आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात वावरतात. परंतु सध्या मार्च हीट सुरू असल्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला आहे. वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वन फिरावे लागत आहे.
दरम्यान, वनविभागाने पाणवठ्यांत पाणी सोडण्याची मागणी वन्यप्रेमींसह नागरिकांनी केली आहे.


01368

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Raigad Flood: भेरव अंबा नदीचा पूल पाण्याखाली; रायगडमधील आदिवासी गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

SCROLL FOR NEXT