पुणे

नागापूर येथे घरासमोरून मोटारसायकलची चोरी

CD

निरगुडसर, ता.११ : नागापूर (ता.आंबेगाव) येथील शेतकरी नामदेव मल्हारी मंचरे यांनी घरासमोरील झाडाखाली लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून चोरून नेली. ही घटना बुधवारी (ता.२९ मे) रात्री घडली. याबाबत मंचरे यांनी सोमवारी (ता.१०) फिर्याद दिली. त्यानुसार पारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंचरे यांनी काळ्या रंगाची निळा पट्टा असलेली हिरोहोंडा कंपनीची स्प्लेन्डर प्लस मॉडेलची मोटार सायकल नं. एम.एच.१४ ई.एल.८४२९ ही मोटार सायकल लावली होती. अज्ञात चोरट्याने ता.२९ ते ३० मे दरम्यान सकाळी आठ या दरम्यान घडली आहे. याबाबत मंचरे यांनी गाडीचा खूप शोध घेऊन मिळून न आल्याने त्यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, वर वर्णन केलेली दुचाकी आढळल्यास पारगाव पोलिस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT