पुणे

निरगुडसर परिसरात ड्रोनच्या तब्बल चार तास घिरट्या

CD

निरगुडसर, ता. ३ ः निरगुडसर (ता.आंबेगाव) परिसरात तब्बल चार तास ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे ड्रोन फिरतात तरी कशासाठी याची माहिती ना शासकीय यंत्रणेला, ना पोलिसांना ना ग्रामस्थांमुळे नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत.
मागील काही दिवसांत आंबेगाव तालुक्यासह जिल्ह्यात मध्यरात्री ड्रोन फिरत आहेत. यामुळे सर्वत्र भीती निर्माण झाली आहे. आंबेगाव तालुक्यात मागील दिवसांत लाखणगाव, पोंदेवाडी जारकरवाडी, खडकवाडी, काठापूर भागात ड्रोन रात्रीच्या सुमारास फिरताना आढळून आले. त्यानंतर पुन्हा मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून तर बुधवारी पहाटे २ वाजेपर्यंत निरगुडसर परिसरात ड्रोन तब्बल चार तास घिरट्या मारताना नागरिकांना दिसला. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. निरगुडसर परिसरात वळसेमळा, नह्यारवस्ती, गण्याडोंगर परिसर, निरगुडसर फाटा, थोरात मळा आदी परिसरात ड्रोनने मंगळवारी रात्री १० वाजल्यापासून ते २ वाजेपर्यंत घिरट्या घातल्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तरी पोलिस यंत्रणेने तातडीने तपास लावावा, अशी मागणी निरगुडसर ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT