पुणे

थोरांदळ्यात वारकऱ्यांची बंद घरे चोरट्यांनी फोडली

CD

निरगुडसर, ता. ५ : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील दिंडीसमवेत गेलेल्या दोन वारकऱ्यांची बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली, पण चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
थोरांदळे येथील खरमाळे वस्ती येथील जयराम भीमाजी खरमाळे व कैलास सुदाम टेमगिरे या दोन्ही कुटुंबातील दांपत्य बऱ्याच वर्षांपासून गावातील दिंडीसमवेत आषाढीवारीनिमित्त पंढरपूरला जात असतात. यंदाही दोन्ही कुटुंबे गावातील दिंडी समवेत पंढरपूरला वारीसाठी गेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरांना कुलपे होती. याचाच गैरफायदा चोरट्यांनी घेत शुक्रवारी पहाटे घरांच्या दरवाजांची कुलपे तोडून आत प्रवेश केला. जयराम खरमाळे यांच्या घरातील दोन कपाटे फोडली, पण तिसरे कपाट काही चोरट्यांना फोडता आले नाही. त्यातील सोन्याचा ऐवज वाचला. त्यानंतर कैलास टेमगिरे यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या घरामधील दोन कपाटे उचकली, परंतु त्यांना काही मिळाले नाही.
दरम्यान, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे मनोहर खरमाळे हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना त्यांचेच घर उघडेना. त्यांनी आजूबाजूला राहणाऱ्यांना फोन केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराला लावलेली कडी काढली. तसेच, शेजारच्या दोन्ही घरांच्या दारांच्या कड्या काढलेल्या दिसल्या. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर चोरट्यांनी घरे फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. मनोहर खरमाळे यांनी गावच्या पोलिस पाटील वैशाली टेमगिरे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी मंचर पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली. पोलिस हवालदार नंदकुमार आढारी, एस. सी. भोईर, योगेश रोडे यांनी सकाळी घटनास्थळी घरांची पाहणी करून माहिती घेतली.

‘साक्षात पांडुरंगच धावला’
जयराम खरमाळे यांच्या घरातील दोन कपाटे चोरट्यांनी उचकटली, पण काही सापडले नाही. तिसरे कपाट काही चोरट्यांना फोडता आले नाही आणि सोन्याचा ऐवज वाचला. त्यामुळे साक्षात पांडुरंगच धावल्याची चर्चा गाव परिसरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT