पुणे

शिंगवे येथे चक्क उसाची चोरी

CD

निरगुडसर, ता. २२ : घरातून सोने-नाण्याची चोरी होते, पण शेतामधून चक्क ऊस चोरीला गेल्याची घटना शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवेवस्तीवर घडली आहे, मनीषा गाढवे यांच्या शेतातून अंदाजे एक टन उसाची चोरी झाल्याची घटना सोमवार (ता. २१) रोजी उघडकीस आली आहे.
शिंगवे गावाच्या उत्तरेला गाढवेवस्ती असून, याठिकाणी मनीषा रवींद्र गाढवे यांची ऊसशेती आहे. हे कुटुंब नोकरीनिमित्त वारूळवाडी-नारायणगाव (ता. जुन्नर) येथे राहते. मनीषा गाढवे या येऊन-जाऊन शेती व्यवसाय पाहतात. त्यांनी अडीच एकर क्षेत्रात उसाचे पीक घेतले आहे. या परिसरात चार-पाच दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे गाढवे यांना शेताकडे जायला जमले नाही. सोमवारी पाऊस उघडल्यानंतर त्यांनी उसाच्या शेतात जाऊन पाहणी केली असता एक सरी ऊस तोडून नेल्याचे आढळून आले. अंदाजे एक टन ऊस अज्ञाताने चोरून नेल्याचे गाढवे यांनी सांगितले.

मनिषा गाढवे म्हणाल्या, ‘‘शिंगवे येथे गाढवे मळ्यात मी अडीच एकर शेतात ऊस पिकवला आहे. मी नारायणगाववरून ये-जा करून शेती करत असताना खूप अडचणी येतात. या भागात बिबट्याची मोठी भीती आहे. विजेमुळे रात्री-अपरात्री उसाला पाणी द्यावे लागते. यापूर्वी किरकोळ घटना घडल्या होत्या; परंतु पावसामुळे शेताकडे यायला जमले नाही. त्या काळात शेतातून जवळपास एक टन ऊस चोरीची घटना पहिल्यांदा घडली आहे. याबाबत पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पारगाव पोलिसांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आहे.’’

शिंगवे (ता. आंबेगाव) : मनीषा गाढवे यांच्या शेतातून झालेली उसाची चोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT