पुणे

पिंपळगावात ३५ वर्षांनंतर विद्यार्थी रमले आठवणीत

CD

निरगुडसर, ता. २८ ः पिंपळगाव- खडकी (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयात ‘पुन्हा एकदा, मैत्रीच्या प्रवासात’ या शीर्षकाखाली सन १९८९/९० बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. हे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले होते. या आगळ्या-वेगळ्या संमेलनाची संकल्पना मीना पोखरकर, बाळासाहेब बांगर आणि परेश राऊत यांच्या पुढाकारातून साकार झाली.
या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना आणि राऊत यांनी सादर केलेल्या मैत्रीची प्रतिज्ञाने वातावरण भावनिक झाले होते. कार्यक्रमास माजी शिक्षक सुधाकर शिंदे, सुरेश खोल्लम काशिराम भिटे, प्रल्हाद घाटकर, नंदकुमार नाईक, शिल्पा नाईक, सुषमा शिंदे, कुसुम जाधव, रेखा काकडे आदी उपस्थित होते.
आदर्श शिक्षक आणि सेवकवर्गाचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या कॅप, बॅज, परिचय डायरी व स्लॅम बुकचे अनावरण करून ऑन-स्क्रीन परिचय घेण्यात आला.
परेश राऊत यांनी प्रास्ताविक केले. तनुजा पोखरकर- पडवळ यांनी सूत्रसंचालन, तर संजय भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले. ग्रुपतर्फे विद्यालयास सूचना फलक व सरस्वतीची मूर्ती भेट देण्यात आली.
या संमेलनच्या यशस्वितेसाठी बाळकृष्ण इंदोरे, डी. एन. पोखरकर, संजय भोर, मारुती पोखरकर, किसन पोखरकर, डी. जे. बांगर, दीपाली भोर, जयश्री पोखरकर आदींचे सहकार्य लाभले.

02914

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT