नवनाथ भेके
निरगुडसर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात असलेल्या मनुष्य बळाअभावी यंत्रणेवर ताण बसत आहे. केंद्र व उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक अशा जवळपास अर्ध्या जागा रिक्त आहेत.
निरगुडसर (ता. आंबेगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत निरगुडसर, मेंगडेवाडी पिंपळगाव,खडकी,रांजणी,वळती,भराडी,कळंब,लौकी,चांडोली बुद्रूक असे आठ उपकेंद्र मिळून १५ गावे येतात आणि या उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक यांच्या प्रत्येकी ३-४ जागा अशा एकूण १० ते १२ जागा रिक्त आहेत. कोणतेही प्राथमिक केंद्र उपकेंद्रात सिक्युरिटी गार्ड नाही निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर,आरोग्य सेवक सेविका राहतात; परंतु सुरक्षिततेसाठी सभोवताली जाळीचा वापर नाही तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर २४ तास डॉक्टर उपलब्ध नाही, यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत वारंवार सूचना देऊन देखील यात कोणतीही सुधारणा झालेली नाही.
पदनिर्मिती जुनीच
निरगुडसर प्राथमिक केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची लोकसंख्या एकूण ४० हजार आहे, जागतिक मानांकानुसार दहा हजार लोकसंख्येवर एका एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे. सध्या फक्त दोन वैद्यकीय अधिकारी असून ही पद निर्मिती जुनी आहे. यात सध्याचा लोकसंख्येनुसार फेरपद निर्मितीची गरज असून आहे.याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रोज १०० पेक्षा अधिक ओपीडीसाठी रुग्ण असतात;सरासरी वर्षाला १०० ते १२० प्रसूती,१८० ते २५० कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या ठिकाणी केली जाते. मनुष्यबळ कमी असताना देखील रात्री प्रसूतीसाठी डॉक्टर व स्टाफ उपलब्ध असतात. वर्षाला सरासरी १०० प्रसूती केल्या जातात.
- डॉ.शुभम ढमढेरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, निरगुडसर (ता. आंबेगाव)
2929
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.