निरगुडसर, ता. १४ : खडकी (ता. आंबेगाव) येथील मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये चार दिवसात ७६० बैलगाडे धावले, या यात्रेत घाटाचा महाराजा हा किताब अरबुज कोहिनकर जुगलबंदी (खेड) आणि माणकादेवी मित्रमंडळ (खडकी, ता. आंबेगाव) यांनी पटकावला.
खडकी येथील मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यत शनिवार (ता. ८) ते मंगळवार (ता. ११) चार दिवस पार पडल्या. या शर्यतीत एकूण ७६० बैलगाडे धावले. यात्रेत पहिल्या दिवशी एक नंबरला जगन्नाथ विठ्ठल जाधव यांचा गाडा फळी फोड ठरला. दुसऱ्या दिवशी धनंजय लांडे, कै. रमण निलख (लांडेवाडी), तिसऱ्या दिवशी धोंडिभाऊ बांगर, शेखर थोरात(पिंपळगाव), चौथ्या दिवशी नानासाहेब गुळवे, कै. महादू भोर(खडकी) यांचा गाडा फळी फोड ठरला.
फायनल शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकात आलेले बैलगाडे : गोविंद खिलारी, संतोष सातपुते(भराडी), अनुप मुळे, विभीषण भोसले (मांजरवाडी), नामदार दिलीपराव वळसे पाटील (निरगुडसर), भैरवनाथ बैलगाडा संघटना, विश्वनाथ पवार. यात्रेची सर्व व्यवस्था खडकी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांनी पाहिली.