निरगुडसर, ता.२७ : निरगुडसर-अवसरी फाटा (ता.आंबेगाव) रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करून कामे ठप्प आहेत. अनेक ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक बनला आहे. बनवलेले पर्यायी रस्ते चांगल्या दर्जाचे नाहीत. परिणामी रस्त्यावरील धुळीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्यात ये-जा करण्यासाठी अवसरी फाटा, निरगुडसर, पारगाव मुख्य रस्ता आहे. अवसरी फाटा ते अवसरी, निरगुडसर, पारगाव, पिंपरखेड, जांबूत, शिक्रापूर या ७८ किलोमीटर सिमेंटचा रस्ता बनविण्यास करिता रस्त्यावरील सिमेंट मोऱ्या, मोठे पूल या कामाकरिता ४१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, निरगुडसर ते अवसरी दरम्यान रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे नुसतीच खोदून ठेवली आहेत. पुढील काम तातडीने होणे गरजेचे आहे. परंतु कामे ठप्प आहे. रस्त्यावरील राडा रोडा अनेक ठिकाणी पडलेला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याचे फलक अनेक ठिकाणी नाहीत.
रस्त्यावर अनेक ठिकाणी चढ उतार ठेवल्याने वाहनाचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे, तसेच खड्डे चुकवताना छोटे-मोठे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी वाहन चालक प्रवासी वर्गाकडून होत आहे.
चिखलमय रुतून बसतायेत जड वाहने
रस्त्यावर अनेक ठिकाणी मोऱ्या व पुलाचे नवीन बांधकाम करण्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. मात्र, काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यावर रात्रंदिवस शेकडो वाहनांची ये-जा होत असल्याने संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता बनविला आहे. मात्र, तो रस्ता चिखलमय झाल्याने जड वाहने रस्त्यात रुतून बसतात. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने खडी मुरूम टाकून पर्यायी दर्जेदार रस्ता बनवावा व अवसरी फाटा ते पारगाव सिमेंट रस्त्याचे काम चालू करावे, अशी मागणी वाहन चालक करत आहे.
रस्ता पूर्णपणे चिखलमय
निरगुडसर जवळ हांडे-देशमुख वस्तीजवळ रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. प्रवाशांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
03043
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.