पुणे

खडकीतील शाळेत शालेय साहित्य वाटप

CD

निरगुडसर, ता. ३० ः खडकी (ता. आंबेगाव) येथील काळभैरवनाथ, सौ. लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयात नन्ही कली उपक्रमांतर्गत नांदी फाउंडेशनच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते दहावीतील ९१ मुलींना टी-शर्ट, बूट, मोजे, वही, पेन इत्यादी शालेय साहित्यासह सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.
काळभैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर व नन्ही कलीच्या समन्वयक पुनम भोर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटपासाठी नांदी फाउंडेशनचे दाते, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड व थ्री एम यांच्या विशेष योगदानातून शालोपयोगी साहित्य देण्यात आल्याची माहिती नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली.
यावेळी नन्ही कली मनस्वी पोखरकर, स्वरा थोरात व तनिष्का बुळे यांनी मनोगत व्यक्त करून नांदी फाउंडेशनचे आभार मानले. साहित्य वाटप कार्यक्रमाचे नियोजन मंगल सोनार, माणिक हुले, माधुरी थोरात, प्रभाकर झावरे, शरद पाबळे, ज्योत्स्ना खेडकर, रूपाली ठाकूर, धम्मपाल कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी अरुण सरोदे, संतोष खालकर, संजय नेहरे, रामदास भांड, रामदास लबडे व लक्ष्मण फलके यांचे सहकार्य लाभले.

Suryakumar Yadav ने मला खूप मेसेज केले होते...' बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; नेमकं काय म्हणाली?

VIRAL VIDEO : एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये धक्कादायक घटना; मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशांवर केली लघवी, लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जामोद येथून बदली झालेल्या शिक्षकांच्या रुजूकरणासाठी ठिय्या आंदोलन...

Air India Express Offers : नववर्षाची विमान प्रवाशांसाठी मोठी ऑफर! Air India Express ची Pay-Day Sale सुरू; तिकिटांवर बंपर सवलत

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

SCROLL FOR NEXT