पुणे

पिंपळगाव- निरगुडसर रस्त्याचे काम रखडले

CD

निरगुडसर, ता. ७ ः पिंपळगाव- निरगुडसर (ता. आंबेगाव) रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन पाच महिने उलटले तरी अद्याप रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. या रस्त्याच्या कामासाठी साडेसहा कोटी रुपये निधी मिळाला आहे, तरीही काम काही सुरू झाले नाही.
या सहा किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची कसरत बनली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खडी, डांबर टाकून खड्डे बुजविले आहेत. परंतु, त्याला देखील दीड महिना उलटला. आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने प्रवाशांचा प्रवास पुन्हा खडतर झाला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असून, हा रस्ता मंचर शहराकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते.

पिंपळगाव- निरगुडसर रस्त्याच्या कामासाठी साडेसहा कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. कामाची निविदा देखील संबंधित ठेकेदाराला मिळाली आहे. भूमिपूजन होऊन पाच महिने झाले तरी अद्याप रस्त्याचे काम सुरू नाही. काम लवकर सुरू करावे.
-धनेश पोखरकर, माजी उपसरपंच, पिंपळगाव- खडकी

पिंपळगाव ते निरगुडसर रस्त्यावरील खड्डे खडी आणि डांबर टाकून दीड महिन्यापूर्वी बुजविले आहेत. ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी येत आहे त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या सहा किलोमीटर अंतरासाठी साडेसहा कोटी रुपये निधी आहे. या मार्गावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून, ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याविषयी संबंधित साखर कारखान्यांशी पत्रव्यवहार सुरू आहे. तरी या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
- पी. एन. लोंढे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

03076

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT