पुणे

पिंपळगाव- निरगुडसर रस्ता खड्डेमय

CD

निरगुडसर, ता. २३ ः पिंपळगाव- निरगुडसर (ता. आंबेगाव) रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील प्रवाशांच्या नशिबी खड्डेच खड्डे असल्याचे पहावयास मिळत आहे. ठेकेदार काम सुरू करेना आणि प्रवाशांची खड्ड्यातून वाट सरेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंचर- शिरूर रस्त्यावरील दळणवळणाच्या दृष्टीने पिंपळगाव- निरगुडसर हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आदी प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. या रस्त्यावर पिंपळगाव ते निरगुडसर दरम्यान सहा किमी अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवता- चुकवता प्रवाशांची दमछाक होत आहे. विशेष म्हणजे या सहा किमी रस्त्याच्या कामासाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाची निविदा निघून देखील अनेक महिने लोटले आहेत. परंतु, ठेकेदार काही काम सुरू करेना. साधे रस्ता दुरुस्ती, रस्त्याच्या दुतर्फा झाडे- झुडपे यांची साफ सफाई करेना. यामुळे प्रवाशांचा प्रवास खड्ड्यातूनच होत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावर अक्षरशः वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तरी रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

03116

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT