पुणे

खडकी येथे मिरवणूक

CD

निरगुडसर, ता. २३ ः खडकी (ता. आंबेगाव) येथे शिवजयंतीनिमित्त काळभैरवनाथ इंग्रजी प्री. प्रायमरी स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काळभैरवनाथ, सौ. लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयातील बालचमूंनी शिवप्रतिमेची लेझीम व ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढली.
मिरवणुकीच्या अग्रभागी शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, माँसाहेब जिजाऊ व मावळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीनंतर प्राथमिक शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. काळभैरवनाथ, सौ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजन्माचा पाळणा सादर केला. प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग सादर केले.शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


03147

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात ६० गाड्यांना भीषण आग; ४० दुचाकी आणि २० चारचाकी गाड्या जळून खाक

Army Dog Tyson Story : तीन दहशतवादी केले ठार! आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी; गोळी लागली तरी खचला नाही, पुढे जे झालं...

भारतीयांनो तातडीने इराण सोडा! अमेरिकेसोबतच्या संघर्षानंतर तेहरान दुतावासाचे निर्देश; कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता?

IND vs SA: कधीकधी अतिशहाणपणा नडतो...! अजिंक्य रहाणे प्रचंड संतापला; भारतीय संघाच्या पराभवावर म्हणाला, तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला...

ऐश्वर्याला मुलगी झाल्यावर सलमान खानची 'ही' होती प्रतिक्रिया, म्हणालेला...'मी मामा झालो..'

SCROLL FOR NEXT