निरगुडसर, ता. २० ः वळती (ता. आंबेगाव) येथे शिवनेरी गडावरून गुरुवारी (ता. १९) गावात शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवज्योत उत्सवाचे यंदा ११वे वर्ष आहे.
शिवनेरीवरून शिवज्योतीचे प्रथम भोकरवस्ती येथे आगमन झाले. त्यानंतर शिवज्योत ढोल ताशाच्या गजरामध्ये वळती गावात आणण्यात आली. रस्त्यामध्ये अनेक शिवभक्त महिलांनी सडा- रांगोळी टाकून शिवज्योतीचे पूजन केले. गावात भव्यदिव्य प्रवेशद्वार व अश्वारूढ पुतळा असून पुतळ्याला फुलांची आरास सजावट व विद्युत रोषणाई केली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन आलेल्या सर्व शिवभक्तांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
यावेळी प्राथमिक शाळा वळती, भोकरवस्ती, तसेच भक्तीशक्ती वारकरी संस्था कळंब या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक लेझीम खेळाचे प्रदर्शन केले. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक मावळे व स्नेहल लोखंडे, तसेच शिक्षक बाळासाहेब इंदोरे, अंगणवाडी सेविका सुनंदा भोर व अश्विनी भोर यांनी परिश्रम घेतले. यावेळी भोकरवस्ती परिसरातील महिलांनी एकाच वेशभूषेत सहभाग घेऊन लेझीम खेळाचे प्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर सर्व शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
03149
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.