निरगुडसर, ता. ४ ः भराडी (ता. आंबेगाव) येथील वखारवाडीत लावलेल्या पिंजऱ्यात दोन दिवसात दोन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हे बिबटे सोमवारी (ता. २) आणि बुधवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास जेरबंद झाले. येथील शेतकरी जितेंद्र गोरक्षनाथ गावडे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. बिबट्याची दहशत वाढल्याने वनविभागाने पिंजरा लावला होता. अखेर सोमवारी पहाटे पाच वाजता एक वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी पिंजऱ्यापाशी पहाटेच्या वेळी मादी बिबट पाहिली होती. त्यानंतर पिंजरा त्याच ठिकाणी लावला होता. यावेळी बुधवारी पहाटे तीन ते चार वर्षाची बिबट मादी जेरबंद झाली. पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह निवारा केंद्रात रवाना करण्यात आले.
03177
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.