पुणे

घोडशाखा कालव्यातील झुडपे काढल्याने शेतकऱ्यांत समाधान

CD

निरगुडसर, ता. ५ : डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यांतर्गत असलेल्या घोडशाखा कालव्यातील थोरांदळे, खडकी, नागापूर, जाधववाडीतील पोटचाऱ्यांमधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी काटेरी झाडे झुडपे जलसंपदा विभागाकडून काढली. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील घोडशाखा कालव्यातील थोरांदळे, खडकी, नागापूर, जाधववाडी आदी गावांतील पोट चाऱ्यांत मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढली होती. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. काटेरी झाडे झुडपांमुळे भविष्यात कालवा व पोट चारीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अशी मागणी शेतकरी व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष विशाल जालिंदर वाबळे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत खडकी परिसरातील चारीची जलसंपदा विभागाने यंत्राच्या साह्याने झाडेझुडपे काढली. यावेळी जलसंपदा विभागाचे कर्मचारी अधिकारी, मानका देवी पाणी वाटप संस्था खडकी अध्यक्ष भीमाजी पोखरकर, अनिल पोखरकर, अक्षय पोखरकर, विलास टेमगिरे, वेदांत टेमगिरे, राज टेमगिरे उपस्थित होते.

03181

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

SCROLL FOR NEXT