पुणे

खडकीफाटा येथे गणेश मूर्तींच्या रंगकामाची लगबग

CD

निरगुडसर, ता. १९ : गणेशोत्सव अवघ्या २३ दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात मूर्तिकार व्यस्त आहेत. सजावट केलेल्या गणपतीला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेश मूर्ती पाहण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग आहे. तर कारागीर मूर्तीचे रंगकाम करण्यात मग्न आहेत. आंबेगाव तालुक्यातील खडकीफाटा येथील वृषाली आर्ट्स या गणपती बनवण्याच्या कारखान्यात एक फुटापासून सहा फुटांपर्यंत पाच हजारांहून अधिक मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. धोतर, शाल, फेट्याच्या सजावटीकडे ग्राहकांचा कल असून आकर्षक सजावट असलेल्या मूर्तीला मागणी आहे. पुणे, मुंबई, नगर, आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यातही या मूर्तींना मागणी आहे. येथील मूर्तिकार सुनीता शिंदे, छाया शिंदे, अश्‍विनी शिंदे, मोहन शिंदे, प्रकाश शिंदे, ऋषिकेश शिंदे, ऋग्वेद शिंदे, प्रथमेश दरेकर यांच्यासह १५ मूर्तिकार कारखान्यात मूर्ती घडवत आहेत. पाच हजारांहून अधिक मूर्ती घडविण्यात आल्या आहेत. सध्या उत्पादन खर्चात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. यामध्ये पीओपी, रंग, प्लास्टिकचा कागद काथ्या आदी साहित्याच्या खर्चात वाढ झाली आहे. गणेश मंडळे, काही घरगुती गणेश भक्तांनी मूर्तीच्या बुकिंगसाठी गर्दी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray: ‘रस्त्यात डांबर, पेव्हर ब्लॉक अन् काँक्रीटचा पॅच; हा कसला विकास?’ अमित ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Ramdas Athawale: अभिजित दीपके यांना रामदास आठवलेंचे RPIत येण्याचे निमंत्रण; ‘सुशिक्षित युवा नेतृत्वाची गरज’

Pune Crime: शिरूरमध्ये एमडी विक्रीच्या तयारीत दोघे ताब्यात; २० ग्रॅम मेफेड्रोनसह ९.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; पाच जण जखमी

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

SCROLL FOR NEXT