पुणे

मराठा समाजातील युवकांसाठी ‘ॲम्बिशन’तर्फे मोफत प्रशिक्षण

CD

नीरा नरसिंहपूर, ता. ९ ः बावडा येथील ॲम्बिशन व्हेंजर कॉम्प्युटर एज्युकेशन'' मध्ये मराठा- कुणबी समाजातील युवक-युवतींना ‘सीएसएमएस-डीईईपी’ हा अभ्यासक्रम मोफत शिकवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी सारथी व एमकेसीएल यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रीया १६ जानेवारीपासून सुरू झाली असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲम्बिशन व्हेंजर कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असले पाहिजे, तसेच संबंधित विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे, प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी दाखला आवश्यक आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल ) यांच्याद्वारे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.

मराठा, कुणबी, कुणबी- मराठा आणि मराठा कुणबी समाजातील युवक युवतींसाठी हा अभ्यासक्रम मोफत आहे. सहा महिन्याचा हा अभ्यासक्रम असून, १० हजार युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी बावडा येथील ॲम्बिशन व्हेंजर कॉम्प्युटर एज्युकेशन ग्रामसचिवालय बिल्डिंग ग्रामपंचायत गाळा क्रमांक ९ व १० येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT