पुणे

पीरसाहेब दर्ग्यावर विद्युत रोषणाई

CD

नीरा नरसिंहपूर, ता.१३ : पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) गावचे ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा उरसास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने दर्गाहवरती आकर्षक, मनमोहक अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याची भुरळ तरुणाईसह अबालवृद्ध, महिला व बालकांना पडली आहे.
ग्रामस्थांच्या वतीने आज सोमवारी सायंकाळी नऊ वाजता संदलची सामूहिकरीत्या गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून, ती पिरसाहेबांच्या मजारवर चढवण्यात येणार आहे. उरसानिमित्त गावात स्वच्छता करण्यात आली असून गावाच्या सार्वजनिक खांबावर बल्ब बसवून गाव चकमक चमकवण्यात आले आहे. पिरसाहेबाच्या मजारसह दर्गाहवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी दर्गाह परिसर विद्युत रोषणाईमुळे झगमगून गेले आहे.
यात्रेनिमित्त खेळणी, फुगेवाले, बांगडी दुकाने, आईस्क्रीम, पायनापल, मेवा मिठाईची दुकाने थाटण्यात सुरवात झाली आहे. मागील चार वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमताच एवढ्या मोठ्या प्रमाणात उरुस भरणार असल्याने सर्वत्र उत्साह पहावयास मिळत आहे.


03206

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT